चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात सामाजिक भावनेतून टायगर ग्रुपतर्फे पूरग्रस्तांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यात तितूर व डोंगरी नदीला पूर आल्याने क्षणार्धात होणेचे नव्हते झाले. हजारो पुरग्रस्त्यांचे घरे व जणावरे वाहून गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून अनेक सेवाभावी संस्था ह्या पुढे येऊन मदतीचे हात दिलेले आहेत. अशात टायगर ग्रुपतर्फे तालुक्यातील पूरग्रस्तांना किराणा किटचे वाटप रविवार रोजी करण्यात आले.
मदत टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तानाजी जाधव, उत्तर महाराष्ट्र प्रमुख सागर कांबळे, खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर व तालुका रावेर अध्यक्ष गजनान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सदस्य सागरभाऊ कोळी, सागर जुबंळे, धनराज कोळी, विक्की पाटील, बंडू पाटील, रोहन हिवरकर, दिपक धनगर, लोकेश भवरे , गणेश पाटील, गोकुळ बेलदार, लोकेश कोळी, बाजिराव कोळी, शुभम कोळी, जयेश पाटील, वासुदेव पाटील, कैलास कोळी, हरी कोळी, सौरव पाटील, उमेश बोरसे व भुषण दंडे आदी उपस्थित होते.