चाळीसगाव प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून तिघांनी पिस्तूलासारखे हत्यार व चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना १५ जुलै रोजी सायंकाळी शहरातील अहिल्यादेवही पुतळासमोर घडली. याप्रकरणी तीन जणांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सुमित अशोकराव भोसले (वय-३१) रा. पोतदार शाळेजवळ चाळीसगाव हा आपल्या कुटुंबियासह राहतो. ऑनलाईन सर्व्हिस सेंटर चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. जुन्या भांडणाच्या वादातून काल गुरूवारी १५ जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास चिंग्या उर्फ राज अजीतबेग, झिपु उर्फ अविनाश जगदीश गोयर, बंटी उर्फ चिंग्या सुरेश निकम सर्व रा. चाळीसगाव यांनी शहरातील अहिल्यादेवी पुतळ्यासमोरील मोकळ्या जागेवर बोलावून घेतले. यातील बंटी निकम चिंग्या बेगला म्हणाला की या भाडखावून आज सोडू नको, याला गोळी मार याला जिवंत सोडू नको असे सांगून झिपु गोयर याने पिस्तूलासारखे हत्यार काढले तर चिंग्या बेग याने चाकू काढला आणि बंटीने दंडा काढला. यात सुमित भोसले याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुमित भोसले यांच्या फिर्यादीवरून तीन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.