श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे २२वे अधिवेशन उत्साहात पार पडले. यात विविध महत्वाचे ठराव संमत करण्यात आले.

या अधिवेशनात सकाळी शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते करगाव रस्त्यावरून तेली समाज मंगल कार्यालय जवळ हरी गणपत नगर येथे आल्यानंतर सांगता करण्यात आली. येथेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र बागुल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीवदादा देशमुख, मृद व जलसंधारण अधिकारी सूर्यकांत निकम, युवाध्यक्ष रूपेश बागुल, महिलाध्यक्षा सुषमा सावळे, प्रमोद शिंपी, वंदना जगताप, स्वागताध्यक्ष दिलीप कापडणे, विजय खैरनार, शिवाजीराव शिंपी, विजय खैरनार, नागेश सावळे, संजय खैरनार, गोकुळ बोरसे, हेमंत सोनवणी, गणेश निकुंभ, रूपेश पवार, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी चाळीसगावचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वनेश खैरनार यांनी मावळते राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागुल यांच्याकडून पदभार स्वीकारला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच याप्रसंगी समाजसुधारणेच्या दृष्टीने महत्वाचे असे विविध ठराव संमत करण्यात आले.

याप्रसंगी खासदार उन्मेषदादा पाटील म्हणाले की, २२ वर्षांनंतर चाळीसगाव येथे अधिवेशन असल्याचा सार्थ अभिमान आहे. सुषमाताई साळवे महिला अध्यक्ष नाशिक यांचे माहेर सुद्धा चाळीसगाव येथील त्या मेटकर गुरुजी यांच्या कन्या होत्या. आमच्या शिंपी समाज भगिनी स्मितलताई बोरसे पंचायत समितीच्या सभापती म्हणून राज्यात एकमेव महिला सभापती म्हणून नावलौकिक समाजाला संधी देता आली याचा आनंद आहे.

आमदार मंगेशदादा चव्हाण म्हणाले की, समाजबांधव एकत्रित व संघटित राहिला तर त्या समाजावर अन्याय होत नाही. जाणकार, अभ्यासू समाजबांधव असल्यामुळे समाजाची प्रगती होते. त्यातून समाजातील अनेक घटक मोठे झाले आहे, ही त्याचीच नांदी आहे. समाजासाठी ४० लाख रूपयांचा निधी देण्याची त्यांनी घोषणा केली. माजी आमदार राजीव देशमुख म्हणाले की, एकजुटीमुळे शिंपी समाजाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. या एकजुटीचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. सत्काराला उत्तर देताना वनेश खैरनार म्हणाले की, समाजाने जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करुन समाजाच्या उत्थानासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची त्यांनी या वेळी ग्वाही दिली.

या राष्ट्रीय अधिवेशनाला समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Protected Content