चाळीसगाव प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून तालुक्यात एकाच दिवशी दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा समर्पण अभियानांतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून व भारतीय जनता पार्टी, चाळीसगाव तालुका व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने जम्बो लसीकरण शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकाच दिवसात चाळीसगाव तालुक्यातील ३० गावांना व १० हजार नागरिकांना पहिला व दुसरा कोविशिल्ड डोस देण्यात आला.
यात आडगाव ३००, जुनोने ४००, सांगवी ५००, बोढरे ३००, गोरखपूर ३००, चंडिकावाडी ३००, ओढरे ३००, धामणगाव ३००, पिंपळवाड म्हाळसा ५००, बेलदारवाडी ३००, टाकळी प्र चा ५००, खडकी सीम ३००, खरजई ४००, पिंप्री बु प्र दे ३००, अंधारी ३००, राजदेहरे गावठाण ३००, राजदेहरे सेटलमेंट ३००, राजदेहरे तुका तांडा ३००, चैतन्यतांडा ३००, सुंदरनगर ३००, भामरे ३००, मुंदखेडे खुर्द ३००, मुंदखेडे बु ३००, बोरखेडे खुर्द ३००, तळोन्दा प्र दे ३००, भोरस ३००, वडाळा ५००, चितेगाव ३००, ओझर ३००, डेराबर्डी १००० आदी गावांना १० हजार लसीकरण करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवस मेहनत घेत लसीकरण करणार्या नागरिकांचे रजिस्ट्रेशन केले व लसउत्सव यशस्वी करून दाखवला.