चाळीसगावात राजयोग ध्यान व शांती उद्यानाचे भूमिपुजन

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या निधीतून शहरात बारा ज्योतिर्लिंगाचा आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यान उभारण्यात येत असून याचे विधीवत भूमिपुजन करण्यात आले.

या संदर्भातील वृत्त असे की,आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून ब्रह्माकुमारीज अर्थात, वर्ल्ड रिन्युअल स्प्रिच्युअल ट्रस्टच्या माध्यमातून शिवलिंग आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यानाची निर्मिती केली जात आहे. शिवलिंग आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यानाचे भूमिपूजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ध्यान आणि सेवाभाव केंद्रस्थानी ठेऊन काम करणार्‍या ब्रह्माकुमारीज ट्रस्टचे त्यांनी कौतुक केले. व हे पुण्याचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले. शहरातील

करगाव रोड येथील गजानन हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत होणार्‍या या केंद्राचे बांधकाम, गेट, वाल कंपाऊंड, प्रदक्षिणा मार्ग व उद्यान सुशोभीकरण यासाठी जवळपास २० लाखांचा निधी खर्च होणार आहे. हे केंद्र शिवलिंग आकारात असून बाहेरून बारा ज्योतिर्लिंग प्रतिमा स्थापित केल्या जातील. त्यामुळे भाविकांना सर्व बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी होईल.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आलेले ब्रह्माकुमारीज जळगाव उपक्षेत्राच्या निदेशिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी सदर केंद्रासाठी जागा देऊन सहकार्य करणार्‍या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अमळनेर येथील विद्या दीदी, येथील संचालिका ब्रह्माकुमारी वंदनादीदी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, संजय भास्करराव पाटील, भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, के.आर. पाटील, अमोल नानकर, भास्कर पाटील, कपिल पाटील, राकेश बोरसे, धनराज पाटील, मनोज गोसावी, भूषण पाटील आदींसह ब्रह्मकुमारीज उपासकांची उपस्थिती होती.

Protected Content