चाळीसगाव प्रतिनिधी । आंध्र प्रदेशातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील भक्तगण जात असल्याने ओखा- रामेश्वरम एक्सप्रेसला थांबा मिळावा अशी मागणी युनिटी क्लबच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आंध्र प्रदेशातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील भक्तगण जात असल्याने बहुतांशी प्रवास हा रेल्वेद्वारा होत असतो यात मनमाड, जळगाव आणि औरंगाबाद येथून भाविक प्रवास करीत असतात यात अनेकांची गैरसोय होत असते. यास्तव ओखा- रामेश्वरम (16734) या रेल्वेस चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, जळगाव येथून नवजीवन एक्सप्रेस, जोधपूर- चेन्नई, तर मनमाड येथून अजंता एक्सप्रेस, शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस द्वारे व औरंगाबाद येथून साप्ताहिक असलेली तिरुपती स्पेशल एक्सप्रेस व रेणीगुंठा एक्सप्रेस याद्वारे भाविक प्रवास करीत असतात परंतु थेट तिरुपती येथे दर्शनार्थ जाण्यासाठी असलेल्या रेल्वे गाडीस चाळीसगाव येथे थांबा नसल्याने अनेक भाविकांची गैरसोय होत आहे.
यात प्रवाशांच्या सोयीसाठी थेट चाळीसगाव येथून ओखा-रामेश्वरम (16734) या साप्ताहिक रेल्वेस थांबा मिळाल्यास प्रश्न मार्गी लागणार आहे. सदर ओखा रामेश्वरम ही रेल्वे जळगाव येथे मध्यरात्री 02:30 वाजता असून मनमाड येथे पहाटे 05:10 वाजता आहे तरी सदर रेल्वेस चाळीसगाव येथे थांबा मिळावा यासाठी युनिटी क्लबच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मनीष मेहता, गितेश कोटस्थाने, प्रवीण बागड, भुपेंद्र शर्मा, निशांत पाठक, विनोद चौधरी, राकेश राखुंडे, स्वप्निल धामणे, निरज कोतकर, पियुष सोनगिरे, भूषण भामरे, निलेश सेठी, मनिष ब्राह्मणकर, संजय दायमा, आशुतोष वर्मा, निलेश शेंडे, मुनेष चौधरी, विनोद मोरे, स्वप्निल कोतकर आदी उपस्थित होते.