चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील जामडी शिवारातील एकाच्या शेतातील विहीरीच्या पाण्यात बुडून वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील जामडी येथील शांताराम बापू मदने (वय-७१) ह.मु. जामडी ता. चाळीसगाव या वृद्धेचा जामडी शिवारातील एकाच्या विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान गणेश मदनसिंग राजपूत यांच्या शेतातील विहिरीत हि घटना घडली आहे. तुषार मदनसिंग राजपूत यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.