चाळीसगाव न.पा.चे दुर्लक्ष : रस्ते दुभाजक बनले कचराकुंड्या (व्हिडीओ)

chalisgaon

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील रस्ते बनविण्यात येत असून डिवाइडरमध्ये शोभेची झाडे लावून शहर सुशोभिकरण करण्याचे स्वप्न येथील नगर पालिकेने डोळ्यासमोर ठेवले होते. डिवाइडर होऊन काही महिने उलटून गेले मात्र अद्यापही यात झाडे लावण्यात आलेली नाहीत. याचाच गैरफायदा घेत परिसरातील लोक त्यात कचरा टाकून घाण पसरवित आहेत.

शहरातील रस्त्यालगत असलेले दुकानदार व आतिक्रमण धारक हातगाडीवाले हे डिवाइडरचा कचराकुंडीसारखा वापर करु लागले आहे. दुकानांमधील घाण तसेच हॉटेल व्यवसायिक उरलेले शिळे अन्न, वडापाव दुकानवाले, भजीवाले यांचा प्लास्टिक कचरा यामध्ये टाकू लागले आहेत. यामुळे शहराच्या सुंदरतेत भर पडण्यापेक्षा शहराचे विद्रूप दर्शन मात्र शहरवासीय व बाहेर गावातून येणाऱ्या लोकांना होऊ लागले आहे. चाळीसगाव रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर असलेल्या डिवाइडरमध्ये अशाच प्रकारची घाण रेल्वेमधून उतरल्यानंतर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना दर्शनी भागात पाहावयास मिळतेय. नगरपालिका आरोग्य विभागाने या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली असून रस्त्याच्यामध्ये असलेल्या डिवाइडरमध्ये कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर व अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Protected Content