Home क्राईम चाळीसगावात गोळीबार करणारे दोघे गजाआड

चाळीसगावात गोळीबार करणारे दोघे गजाआड

0
93

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील हुडको कॉलनीत युवकावर गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला करणार्‍या दोघा दुचाकीस्वार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे व मालेगावातून ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता शेख मोहम्मद साबीर मोहम्मद गालीब (वय २५, रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव) हा मदिना मशीदजवळ गप्पा मारत होता. त्यावेळी दोघांनी शेख मोहम्मद याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर गोळीबार करणारे फरार झाले होते.

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याबाबत पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले होते. त्यानुसार विजयसिंग पाटील, सुधाकर अंबुरे, रामकृष्ण पाटील, राहुल पाटील यांना चाळीसगावला रवाना करण्यात आले होते. त्यांनी तपासाची चक्रे फिरवून अरबाज दाऊद पिंजारी (रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) व शोएब शेख असलम उर्फ माया (रा. चाळीसगाव) या दोन आरोपींना अटक केली आहे.


Protected Content

Play sound