चाळीसगाव प्रतिनिधी । घरात कोणाला काही एक न सांगता गेलेली ३५ वर्षीय विवाहित महिला तालुक्यातील वलठाण येथील शिवारातून बेपत्ता झाल्याने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक वृत्त, राजेश पावरा (वय-३५) हे रा. जामणापाडा ता. शिरपूर येथील असून हल्ली आपल्या परिवारासह तालुक्यातील वलठाण येथे वास्तव्यास आहेत. दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी सुशिला ह्या घरात कोणालाही काही एक न सांगता येतील शेत शिवारातील एकाच्या घरातून बाहेर कुठेतरी निघून गेल्या. पती राजेश पावरा यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता मिळून आले नाही. म्हणून हरवल्याची खात्री झाल्याने सदर महिलेच्या पतीने ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना/३४३ महेंद्र साळुंखे हे करीत आहेत.