Home Cities चाळीसगाव चाळीसगावात भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

चाळीसगावात भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

0
38


चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मे. राजकुमारा माणिकचंद अग्रवाल या विक्रेत्याकडील भेसळयुक्त सोयाबीन तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.

तेलात भेसळीचा संशय बळावताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी शुक्रवारी स्टेशन रोडवरील मे. राजकुमार माणिकचंद अग्रवाल या विक्रेत्याकडील ३ लाख ९३ हजार रूपयांचा सोयाबीन तेलाचा साठा साठा जप्त करण्यात आला. याच्या अंतर्गत विवेक पाटील, नमुना सहाय्यक चंद्रकांत सोनवणे यांच्या पथकाने १५ लिटरचे ४९ कॅन्स, प्रत्येकी १८० किलो वजनाचे १६ बॅरल असा सुमारे ४ लाख किंमतीचा तेलसाठा जप्त केला. तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी शिळी, स्वस्त दरातील, रंगीत व हलक्या दर्जाची मिठाई घेणे टाळावे. खवा व इतर अन्नपदार्थ, पॅकबंद पदार्थ घेताना त्याचा समूह क्रमांक व उत्पादन तारीख तपासून घ्यावी. खरेदीनंतर बिल घ्यावे. भेसळीबाबत संशय आल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी केले आहे.


Protected Content

Play sound