चाळीसगाव प्रतिनिधी | घराबाहेर खेळायला जातो म्हणून गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञाताने पळविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील हूडको कॉलनीतील शेख साखीर शेख कासम हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहेत. दरम्यान त्यांचा मुलगा अय्यान उर्फ सोनू शेख साखीर (वय-१४) हा सोमवार,४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरच्यांना घराबाहेर खेळायला जातो म्हणून सांगून गेला. मात्र तो घरीच न परतल्यामुळे घरच्यांनी त्याला परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली. परंतु अय्यान उर्फ सोनू शेख साखेर हा मिळून आला नाही.
यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने माझ्या मुलाला फुस लावून पळविले आहे. याची खात्री झाल्यानंतर शेख साखीर शेख कासम यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३६३ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि बिरारी हे करीत आहेत.