खळबळजनक : बोढरे गावातील बेपत्ता बालकाचा खून ; मृतदेह आढळला पोत्यात

167d69c6 4840 4d53 9f10 82cd5970f283

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोढरे गावातील एका बेपत्ता बालकाचा खून झाल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. बालकाचा मृतदेह एका विहिरी लगत असलेल्या खड्ड्यात गोणपाटात टाकून फेकण्यात आला होता.

 

या संदर्भात अधिक असे की, बोढरे येथील ऋषिकेश पंडित सोनवणे (वय १०) हा शुक्रवारी २९ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजेपासून गावातून बेपत्ता झालेला होता. सर्वत्र शोध घेऊन देखील ऋषिकेश कुठेही आढळून न आल्यामुळे या संदर्भात हरवल्याची नोंद चाळीसगाव पोलिसात करण्यात आली होती. दरम्यान, आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारस बोढरे गाव शिवारातीलाच पेट्रोलपंप समोरील एका विहीर लगत असलेल्या खड्ड्यात एका गोणपाटातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन बघितले असता. गोणपाटावर मोठे दगड ठेवलेले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोते उघडून बघितले असता, कुजलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. थोड्याच वेळात त्या बालकाची ओळख ऋषिकेश सोनवणे अशी पटली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी श्री.कडलग, पो.नि. प्रतापराव शिकारे, विजयकुमार ठाकूरवाड, पीएसआय सुधीर पाटील,श्री. पांढरकर, एसआय काळे व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content