पोलिसांनी सापळा रचून दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद!

चाळीसगाव, प्रतिनिधी । येथे गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरू असताना दुचाकी चोरटा हा शहरातील हिरापूर बायपासला येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगावात दुचाकी चोरीचे प्रमाण हे वाढलेले असताना दुचाकी चोरटा हा शहरातील हिरापूर बायपासला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी सापळा रचून धनराज गजानन समकर (वय-१९ रा. चाळीसगाव) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता शहर पोलिस स्थानक भाग ५ गुरन १७६/२०२१ भादवी कलम-३७९,३४ मधील होंडा शाईन हि मोटारसायकल त्याने  चोरल्याची कबूली त्यांनी दिली. सदर मोटारसायल हि नाशिक येथील यश सुधाकर इंदोलकर (२०) व यश नंदु कांबडे (१९) (दोन्ही  रा. सामनगावरोड नाशिक) यांच्या साहाय्याने तेथेच लपवून ठेवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  शहर पोलिसांनी यश सुधाकर इंदोलकर (२०) व यश नंदु कांबडे (१९) दोन्ही रा. सामनगावरोड नाशिक यांना अटक केली आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता  होंडा शाईन एम.एच.१९ सीके ५५२३,  हिरो होंडा स्पलेंडर एम.एच.२० एक्यू २८१,  होंडा ड्रीम युगा एम.एच.१५ डीझेड ८५९५ ,  होंडा हंक एम.एच.१५ सीड्ब्लू ७७१० आदी दुचाकी चोरल्याची त्यांनी कबूली दिली आहे.  हि कारवाई शनिवार,२८ रोजी करण्यात आली. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार सपोनि सचिन कापडणीस, सफौ अनिल अहिरे, पोना शैलेंद्र पाटील, पोना प्रविण संगेले, पोकॉं निलेश पाटील, पोकाॅ दिपक पाटील, पोकॉ विनोद खैरनार, विजय पाटील, भुषण पाटील, शरद पाटील, प्रविण सपकाळे, पोकॉ अशोक मोरे, पोकॉ पवन पाटील व पोकॉ अमोल भोसले आदींनी हि कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सफौ अनिल अहिरे हे करीत आहेत.

 

Protected Content