चाळीसगाव प्रतिनिधी । भडगाव येथे वाणी समाजातील गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून येत असतांना नाशिक व मालेगाव येथील वाणी समाजबांधवांच्या एर्टीगा गाडीचा दुपारी तीन वाजेच्या सुमारास खरजई नाका परिसरात अपघात झाला. यात गाडीतील 8 प्रवाशांना तात्काळ भडगांव रोड स्थित कल्पतरु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यातील पाच जणांना नाशिक येथे तर एक पुण्याला तर उर्वरित चाळीसगाव येथे तिघांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव येथे वाणी समाजातील गंधमुक्तीचा कार्यक्रम संपल्यानंतर नाशिक आणि मालेगाव येथे मारूती आर्टीका कारचा रस्त्यावर काम सुरू असलेल्या काँक्रीटरोड बनविणाऱ्या मशिनीला जोरदार धडक दिल्याने गाडीतील नऊ जण जखमी झाले आहे. सुरूवातील जखमी झालेल्या नऊ जणांना भडगाव रोडवरील कल्पतरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमी रुग्णांत नाशिक व मालेगाव येथील वाणी समाजबांधवांचा समावेश असून त्यातील ५ जखमींना पुढील उपचारार्थ नाशिक येथे तर एका रुग्णास पुणे येथे हलविण्यात आल्याचे योगेश भोकरे यांनी यावेळी सांगितले. अपघात झाल्यानंतर जखमींना जितेंद्र गोल्हार, निलेश कोतकर, अमोल पाखले आदी समाजबांधवांनी नाशिक व पुणे येथे उपचारार्थ दाखल करण्यासंदर्भात मदत केली.
जखमी झालेल्यांची नावे याप्रमाणे
राजेंद्र धांडे, सुवर्णा धांडे दोन्ही रा. दाभाडे ता.मालेगाव, स्वाती धामणे, रमाकांत धामणे, नुतन धामणे तिघे रा. मालेगाव, विवेक येवले रा. पिचर्डे ता. भडगाव, सुनिता शिरोडे रा. कोपरगाव ता.नगर आणि वंदना शिरोडे रा. सायगाव यांच समावेश आहे.
जखमी घेवून जाणाऱ्या रूग्णवाहिकेस अपघात
दरम्यान, अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यासाठी खासगी रूग्णवाहिकेद्वारे पाठवित असतांना बेलगंगा साखर कारखान्याजवळ रूग्णवाहिकेचा देखील अपघात झाल्याचे वृत्त समोर आले.
Hi