चाळीसगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज गूरूवार दि.८ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात स्व.सूषमाजी स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, खासदार उन्मेष पाटील, तालूकाध्यक्ष के.बी साळुंखे, बाबासाहेब चंद्रात्रे, जोर्वेकर पाहूणे,राजेंद्र सोनवणे वकील, दिनेश बोरसे,यांनी श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सरचिटणीस प्रा.सूनील निकम यांनी केले. मान्यवरांनी स्व.सूषमाजींच्या संपूर्ण वैयक्तिक, शैक्षणिक, राजकीय जीवनावर प्रकाश टाकला. आज त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची व देशाची मोठी हानी झाली आहे असे मान्यवरांनी मत व्यक्त केले. याप्रसंगी शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, उपसभापती संजू धर्मा, आबा वाघ, शेषराव बापू, राजूआण्णा चौधरी, भाऊसाहेब जगताप, मंगेश चव्हाण, डॉ. महेंद्रसिंग राठोड, डॉ. सतीश पाटील, अनिल नागरे, धनंजय मांडोळे, अमोल नानकर, बंडू पगार, अनिल गायकवाड, नितीन पाटील, कार्यालय मंत्री अरूण पाटील, डॉ. रवींद्र मराठे, भैय्यासाहेब सोनवणे,राजू पगार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.