चाळीसगाव प्रतिनिधी । दोन दिवसांपासून गॅस सिलेंडरचा भाव वाढल्याने चाळीसगाव शहरातील गॅस एजन्सीच्या संचालकांनी जुने सिलेंडर साठवून नव्या दरात विकले जात असल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत महसूल विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचे सुज्ञ नागरीकांकडून बोलले जात आहे.
याबाबत माहिती अशी, गेल्या दोन दिवसांपासून देशात गॅस सिलेंडरचे भाव 24 रूपयांची वाढविण्यात आले होते. चाळीसगाव गॅस एजन्सी संचालकांना चक्क आपल्याकडे काही दिवस जुना स्टॉक शिल्लक असतांना ग्राहकांना विविध कारणे सांगून गॅस देणे लांबविण्यात आले होते. अचानकपणे गॅस सिलेंडरचा भाव वाढीचा भडका झाल्याने गॅस एजन्सी संचालकांनी जुना स्टॉक सिलेंडर आता नव्या दराने देण्यात येत आहे.
महसुल विभागाने अश्या एजन्सीचा शोध घेऊन त्यांच्या गोडावून स्टॉक महिन्याच्या शेवटी किती होता, याचा आढावा घ्यावा. ग्रहाकांना सांगण्यात येते की, आज गॅसची गाडी आली नाही, माल शिल्लक नाही, आमची गॅस वितरण करणारी गाडी खराब झाली आहे, असे अनेक कारण सांगून नवीन दर वाढले की जुना भावाचा माल नवीन दरात विकले जाते. महसुल विभाग यांच्या कडे दुर्लक्ष का करते ? यांच्यावर कारवाही व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे कोण आहे अशे गॅस वितरक याचा आधी शोध घेणे गरजेचे झाले असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे.