चाळीसगाव प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या महापुरात अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. या अनुषंगाने शहरातून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत व सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने या पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या पुरग्रस्तात अनेकांचा जीवणमरणाचा प्रश्न उभा आहे. या अनुषंगाने एक हात मदतीचा या अंतर्गत माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी पुकारलेल्या आवाहनाला साद देत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपअभियंता नवनाथ सोनवणे व त्यांचे सहकारी यांच्या तर्फे बटाटे 25 कट्टे आणि कांदा सुमारे 30 गोणीचे राजपूत मंगल कार्यालयात पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.