जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सुरभि बहुउद्देशीत महिला मंडळातर्फे चैत्रगौर हळदीकुंकू कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
सुरूवातीला अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते चैत्रगौरचे पूजन करण्यात आले. 1 मे रोजी मोटारसायकल रॅली व 3 मे ला गणेश कॉलनीतील श्री दत्त मंदिरात सकाळी 8 वा श्री परशुरामाची आरती व संध्याकाळी 5 वा श्रीराम मंदिरातून निघणाऱ्या श्री परशुराम जन्मोत्सव शोभा यात्रेची माहिती व प्रास्ताविक स्वाती कुळकर्णी ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन तसेच चैत्रगौरीविषयी माहिती वैदेही नाखरे ह्यांनी केले. मनोरंजनात्मक घेण्यात आलेल्या.
स्पर्धेच्या डॉ. वैजयंती पाध्ये, दीप्ती बडकस, योगिनी राव ह्या मानकरी ठरल्या. यावेळी नविन सभासद उषा पाठक, अनिता देशपांडे, दिप्ती बडकस, दिपाली कुळकर्णी, नम्रता कुळकर्णी, सोनाली करमरकर, ऋचा मोहरील ह्यांचा सत्कार करण्यात आला.
सुनीता सातपुते, साधना दामले, मेघा नाईक, ज्योती भोकरडोळे, निलीमा नाईक, अश्विनी जोशी, भारती राव, माधुरी फडके,अंजली धवसे व सिद्धिविनायक मंदिर संचालक ह्यांचे सहकार्य मिळाले. रोहिणी कुळकर्णी ह्यांनी गायलेल्या देवीच्या गजरावर महिलांनी फेर धरून कार्यक्रमाचा आनंद घेतला. कैरी डाळ व कैरी पन्हयाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.