फैजपूर, प्रतिनिधी | माजी गृहराज्यमंत्री जे. टी. महाजन यांचे पुत्र, मसाका चेअरमन तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन यांचा प्रवेश उद्या धुळे येथे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे.
शरद महाजन यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेले चार दिवसांपासून सुरू असल्याने त्या चर्चेला उद्या पूर्णविराम मिळणार आहे. मंगळवारी धुळे येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय भाजपचा कार्यकर्ता मेळावा असल्याने त्याठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाहे उपस्थित राहणार आहेत. त्याठिकाणी मसाका चेअरमन शरद महाजन यांच्यासह साखर कारखान्याचे काही संचालक देखील प्रवेश करणार आहेत. महाजन यांचे निकटवर्तीय शेकडो कार्यकर्ते यांचा देखील भाजपात प्रवेश होणार आहेत. या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असल्याने विधानसभेत काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागेल. मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकरी हीत व या भागातील वैभव टिकून राहावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शरद महाजन भाजपात प्रवेश करत आहेत. महाजन यांना काँग्रेसच्या पदाधिकारी यांना थांबवण्याच्या प्रयत्न केला असला तरी ते अपयशी ठरले आहे. या प्रवेशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आ. हरिभाऊ जावळे उपस्थित असतील.