सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेसमोर साखळी उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता महापालिकसमोर साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. यावेळी उपोषणकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणबाजी देण्यात आली.

 

जळगाव महापालिकेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह इतर विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी, निवेदने देण्यात आलेली आहे. परंतू महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कोणत्याही मागण्या अद्यापपर्यंत पुर्ण झालेल्या नाहीत. शिवाय महापालिकेच्या अस्थापना विभागातील अधिकारी आणि शासनाचा अधिकारी यांच्यात कोणतीही समन्वयाची भूमीका दिसून येत नाही. या अनुषंगाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, ग्रॅज्यएटी देण्यात यावी, अर्जीत रजेची रक्कम देण्यात यावी, सातवा वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा, अनुंकपावर नियुक्ती करण्यात याव्यात, नविन नियुक्त्यांसाठी नोकर भरती करण्यात यावी, सफाई कर्मचाऱ्यांच्या भरत्या कराव्यात या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी चंद्रकांत पंधारे, अशोक चौधरी, सुरेश चौधरी, विकास बुवकर, भागवत कोल्हे, दिनेश मालचे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content