

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी कँग्रेस-काँग्रेस-रिपाइ व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांचे प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जाहीर सभा उदया शनिवार 13 एप्रिल 2019 रोजी आयोजन करण्यात आले आहे. सदरील सभेचे आयोजन भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे दुपारी होणार असून यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



