जळगाव , प्रतिनिधी | योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत घेण्यात येणार्या योग परिचय व योग शिक्षक उत्तीर्ण साधकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रमाणपत्र वाटपाप्रसंगी डॉ. प्रशांत फालक, योग पंडित निलाबरी जावळे, प्रा.चित्रा महाजन, डॉ. भावना चौधरी, डॉ. अलका इंगळे, उपस्थित होते. सुप्रसिद्ध वक्ते डॉ. प्रशांत फालक यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्व यावर मार्गदर्शन केले. ओंकार प्रार्थना जयश्री रोटे यांनी म्हटली. पाहुण्यांचा परिचय कविता चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा चौधरी तर आभार नीलिमा लोखंडे यांनी मानले.