केंद्र सरकार ५०० मोठया कंपन्यांमध्ये १ कोटी तरूणांना इंटर्नशिप देणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी पहिली नोकरी करणाऱ्या तरूणांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या तरूणांची पहिली नोकरी असेल आणि त्यांची नोंदणी ईपीएफओकडे असेल अशा तरूणांना पंधरा हजार रूपये त्यांच्या पीएफ अकाऊंटमध्ये सरकार भरेल. ही रक्कम तीन टप्प्यात भरली जाईल अशी घोषणाही सीतारमण यांनी केली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे दिले जातील.

सरकारने या योजनेची घोषणा करून पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्या तरूणांसाठी भेट दिली आहे. ज्या तरूणाचा पगार एक लाखा पेक्षा कमी असेल अशा तरूणांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेचा फायदा जवळपास 2.1 लाख युवकांना होण्याचा अंदाज असल्याचे यावेळी निर्मला सीतारमण यांनी सांगितले. जे 15,000 हजार दिले जाणार आहेत ते तीन टप्प्यात दिले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

निर्मला सीतारमण यांनी सांगितले की सरकारने 9 गोष्टींना प्राधान्य दिले आहे. त्या पैकी रोजगार आणि कौशल विकासाचाही समावेश असल्याचे त्यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच सांगितले. त्यामुळेच पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी भेट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या तरूणांना याचा फायदा होणार आहे.

मोदी सरकारच्या 5 व्या नवीन योजनेअंतर्गत 500 मोठ्या कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिपला संधी मिळणार आहे. सरकारच्या इंटर्नशिप योजनेचा 1 कोटी तरुणांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारचं तरुणांना इंटर्नशीपसाठी खास पॅकेज असणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार तर आहेच, याशिवाय प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये इंटर्नशिप भत्ताही दिला जाणार आहे.

Protected Content