मुंबई (वृत्तसंस्था) तीन ते चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. पण, केंद्र सरकारने त्यावेळी चांगला भाव दिला नाही. यामुळे पुढच्या हंगामात कांदा उत्पादक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे. अगदी हे असे होईल याबाबत मी तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिले होते, असा खुलासाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दि इंडियन एक्स्प्रेस दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, तीन ते चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. पण, केंद्र सरकारने त्यावेळी चांगला भाव कांद्याला दिला नाही. यामुळे पुढच्या हंगामात कांदा उत्पादक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला. आता आपल्याला तुर्कीतून कांदा आयात करावा लागत आहे आणि कांदा आयात करून केंद्र सरकारने नक्कीच चूक केली आहे. या सगळ्यांविषयी मी तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यात हे असे घडेल असा इशारा दिला होता, असे पवार यांनी सांगितले.