रावेर (प्रतिनिधी) :– केंद्र सरकारचे स्वच्छ भारत मिशनचे उपसचिव रमेश त्रिपाठी हे आज जिल्हा दौर्यावर येत आहेत.
राज्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या कामांची पाहणी व माहिती घेण्यासाठी नवी दिल्ली येथून केंद्र सरकारचे स्वच्छ भारत मिशनचे सचिव रमेश त्रिपाठी येणार आहेत. त्यांच्या कडे महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याची जबाबदारी आहे आज सायंकाळी ते रावेरमध्ये दाखल होतील. यावेळी त्यांच्या सोबत बर्हाणपुरचे जिल्हाधिकारी उमेश कुमार देखील असणार असतील. ते रावेर येथील पंचायत समितीत येण्याची शक्यता असुन कुसुंबा गावाला भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत गट विकास अधिकारी हबीब तडवी, विस्तार अधिकारी सी.आर. महाले, डी. एस. सोनवणे, स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक समाधान निंभोरे, भिमराव तायडे, मंजुश्री पवार यांची उपस्थिती असेल. कुसुंबा येथे पाहणी केल्यानंतर रमेश त्रिपाठी हे त्यानंतर जळगावला जाणार आहेत.