कासोदा ता. एरंडोल (वार्ताहर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज तंबाखू मुक्त अभियान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णांना तंबाखू सेवन न करण्याची शपथ दिली.
आज कासोदा येथील आरोग्य केंद्रात 31 मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मॅडम व कासोदा आरोग्य केंद्र कर्मचारी व नागरीका उपस्थित होते. तर तालुक्यातील तळई येथे देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरपंच यांच्या हस्ते तंबाखू विरोधी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.एम भगत, वैदयकिय अधिकारी ,आरोग्य सहाय्यक ,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.