यावल प्रतिनिधी । हंबर्डी येथे श्री विठ्ठल मंदिरात आज महाराष्ट्र भुषण संत वै. विठ्ठल महाराज तळेले (हंबर्डीकर) यांची ४४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळेस विठ्ठल महाराज यांच्या हस्त चित्रित प्रतिमा वै.ह.भ.प. डिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे गादीपती, ह. भ. प. दुर्गादास महाराज नेहते यांच्या उपस्थित भक्तगणांना वाटप करण्यात आले. आध्यात्मिक ज्ञानाने भक्तीची ओढ लागावी, या उद्देशाने प्रतिमा तयार करण्याची संकल्पना खेमचंद पाटील यांनी दिली. त्यावर अमोल भागवत पाटील याचे प्रतिमा तयार करण्यास मोठे योगदान आहेत.
दीपक जनार्दन तळेले यांच्या अर्थ साहाय्याने भक्तांना प्रतिमा तयार करून वाटप करण्यात आल्या. त्या वेळेस श्री विठ्ठल मंदिर संस्थान हंबर्डी याचे सर्व पदाधिकारी व भक्तगण वसंत बेंडाळे, विलास पाटील, अण्णा तळेले, सुपडू भिरुड, भरत पाटील, गोपाळ महाराज यांच्यासह भक्तगण उपस्थितीत होते.
हंबर्डी गावासह परिसरात भागवत धर्माची मुहूर्तमेढ रोवून त्याचा प्रसार व प्रचार करण्याचे श्रेय ह.भ.प. गुरुवर्य विठ्ठल महाराज हंबर्डीकर यांना जाते. विठ्ठल महाराजांच्या उल्लेख केल्या शिवाय हंबर्डी गावाचे महत्व अपूर्णच राहते. हंबर्डी गावातील तळेले कुटुंबात विठ्ठल महाराजांचा जन्म झाला. बालपणापासूनच महाराजांना भजन व इतर धार्मिक, अध्यात्मिक कार्यामध्ये रूची निर्माण झालेली होती. वै.विठ्ठल महाराज प्रभु पांडुरंगरायाचे निष्ठावंत व एकनिष्ठ वारकरी होते. त्यांनी वैकुंठवासी सद्गुरु दिगंबर महाराज चिनावलकर यांच्या पायी दिंडीचे ते द्वितीय महंत होते. त्यांनी त्याच्या गुरूने दाखविलेल्या भक्ती मार्गाचा आणि सुस्काराचा व्यसनमुक्तीचा प्रसार केला.