शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महात्मा फुलेंची जयंती साजरी

 

 

जळगाव, प्रतिनिधी ।  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात क्रांतिसूर्य  व स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

महात्मा फुलेंची जयंतीनिमित्ताने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत अभिवादन केले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, कार्यालय अधीक्षक डॉ. ए. यु. शिरसाठ, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. संदीप पटेल, डॉ. संजय बनसोडे, डॉ. विजय गायकवाड, अधिसेविका कविता नेतकर, ज्ञानेश्वर डहाके, लीलाधर कोळी आदी उपस्थित होते.

 

Protected Content