जामनेर येथील ज्ञानगंगा विद्यालयात ”माह सप्टेंबर २०२१” साजरा

जामनेर प्रतिनिधी । ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक, मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत ”माह सप्टेंबर २०२१” उपक्रम साजरा करण्यात आला.

प्रसंगी प्रमुख पाहुणे विष्णू काळे, खेमराज नाईक, विजय पाटील हे उपस्थित होते विद्यालयाचे प्राचार्य, आर.जे. सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यालयाच्या उपशिक्षिका स्नेहल पाटील यांनी  शालेय पोषण आहारची  सामूहिक शपथ घेण्यात आली.विष्णू काळे यांनी शालेय पोषण आहार व सप्टेंबर माह २०२१ साजरा करणे संदर्भात मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणामध्ये सरोदे यांनी विविध उदाहरणे देऊन राष्ट्रीय शालेय पोषण आहार उपक्रम अंतर्गत याविषयी सखोल माहिती दिली.तसेच ज्ञानगंगा विद्यालयात शिक्षक पालक विद्यार्थी ऑनलाईन झूम मिटींग, गुगल फॉर्मचे माध्यमातून शापोआ जागृती प्रश्न मंजुषा, विविध कडधान्य व पालेभाज्या उपक्रमातुन जागृती असे कार्यक्रम विद्यालयातून घेतल्याबद्दल विद्यालयाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे उपशिक्षक व्ही.एन.पाटील यांनी केले. तर आभार विद्यालयाचे उपशिक्षक व्ही.एस.कोळी सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content