यावल येथे भगवान विश्वकर्मा जयंती साजरी

यावल प्रतिनिधी । सालाबाद प्रमाणाने साजरी होणारी भगवान विश्वकर्मा जयंती मात्र यावर्षी कोवीड १९ महामारीचे संकट लक्षात घेता, शहरातील सुतार समाजाच्या तरूण मित्रमंडळाच्या वतीने श्री प्रभु विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. 

शहरातील बोरावल गेट परिसरात समाज बांधवांच्या वतीने दिप प्रज्वलन करून भगवान विश्वकर्माच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. राज्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे काटेकोर पालन करीत मोजक्याच समाज बांधवांच्या उपस्थितीत पुजा अर्चना करण्यात आली. या प्रसंगी यावल तालुका सुतार लोहार समाजाचे अध्यक्ष चेतन अढळकर, कोषाध्यक्ष कृष्णा दांडेकर, हेमंत दांडेकर, गणेश अढळकर, सुभाष अढळकर, हेमराज दांडेकर, किशोर दांडेकर, प्रेम दांडेकर, रवीन्द्र अढळकर, भागवत खांडेकर, भुषण दांडेकर, अशोक अढळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

Protected Content