भडगाव (प्रतिनिधी) शहरात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी १०.०० वाजता सावता महाराज मढी येथे प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर सायंकाळी ६.०० वाजता महात्मा फुले यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक तहसिल कार्यालय येथून रथ मार्गे काढण्यात आली.
पोलिस निरीक्षक धनजय येरूळें, विजय भोसले, यांनीही यावेळी प्रतिमा पूजन केले. यावेळी निंबा महाजन, शिवदास महाजन, साहेबराव महाजन, विजय महाजन, प्रकाश महाजन, देवराम महाजन, भिकन महाजन, आप्पा महाजन, दिनेश महाजन, गणेश महाजन, विनोद महाजन, संतोष महाजन, विलास महाजन, विश्वास रोकडे, सुरेश रोकडे, रमेश महाजन, बबलू महाजन, प्रविण महाजन, सागर महाजन, चेतन महाजन, गोकुळ महाजन, सोनू महाजन, ग्यानबा सुर्यवंशी, अशोक महाजन, दत्तू महाजन आदींसह समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.