जळगाव (प्रतिनिधी) महाराणा प्रतापसिंह यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, तहसीदार (महसुल) मंदार कुलकर्णी यांचेसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.