जळगाव (प्रतिनिधी): भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचा ४ था वर्धापन दिन असला तरी पोस्टासोबत हा १ लाच वर्धापन दिन आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत १ लाख ५५ हजार शाखांमार्फत ही सेवा दिली जात आहे. जळगाव विभागात २९६ एस एस पॉईंटद्वारे सुविधा दिली जात असून १० हजारांपेक्षा अधिक खाती उघडण्यात आली असून मोहिमेच्या पेपर लेस व्यवहाराचे उद्दिष्टपूर्ण केले असल्याची माहिती डाक अधीक्षक राजेश रनाळकर यांनी दिली.
भारतीय डाक विभाग अंतर्गत अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचा ४ था वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ४ वर्षापूर्वी भारत सरकारतर्फे तंत्रज्ञानाला अधिक सुलभ बनविण्यासाठी आणि तंत्रज्ञानाची ताकद वाढवी डिजिटल इंडिया मोहीम सुरु करून सर्व व्यवहार हे पेपर लेस करण्यावर भर होता. . गेल्या ४ वर्षात भारतीय डाक विभागात देखील तंत्रज्ञानाच्या दृष्टी पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आधार नोंदणी केंद्रे, Core Banking Solutions (CBS) ज्याद्वारे सर्व एकमेकांशी जोडली गेलीत, इ. अनेक यशस्वीरीत्या अमलात आणले गेलेत. वर्धापन दिनाच्या औचित्याने जळगाव डाक विभागातर्फे खालील प्रमाणे विविध कार्यक्रम राबविण्यात
असे आहेत उपक्रम
जळगाव प्रधान डाकघर येथे विशेष आधार नोंदणी व दुरुस्ती मोहीम, जळगाव प्रधान डाकघर येथे IPPB खाते उघडणे करीता विशेष stall, जळगाव डाक विभागातील सर्व कार्यालयांमधे विशेष IPPB खाते उघडणे मोहीम , सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे त्यांच्या उपविभागात विशेष डाक मेळावे, डिजिटल इंडिया निमित पोस्टमन कर्मचाऱ्यांची रॅली यांचे आयोजन करण्यात आले. तसेच नागरिकांनी पोस्टाच्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डाक अधीक्षक राजेश रनाळकर यांनी केले आहे.