भुसावळ (प्रतिनिधी) येथील तालुका वकील संघातर्फे आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अॅड.तुषार पाटील अॅड. धनराज मगर व इतर पदाधिकारी व वकील बंधू-भगिनी यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर वकील बांधवांनी आपले विचार व्यक्त केलेत. यामध्ये अॅड.प्रफुल पाटील, अॅड.सुनील पगारे,अॅड.मतीन अहमद, अॅड.प्रकाश मोजे, अॅड.धीरज शंकपाळ,अॅड.सुशील बर्गे, अॅड.वैशाली चौधरी, अॅड.अनिल सावळे, अध्यक्षीय भाषण अॅड.तुषार पाटील यांनी केले. या कार्यक्रमात सचिव रामु पाटील, सहसचिव पुरुषोत्तम पाटील, ग्रंथपाल संजय तेलगोटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटेल यांनी केले.