यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी नवरात्रोत्सव ,दुर्गादेवी विसर्जनाच्या विधानसभा निवडणुकीची आचार सहीता लागण्याची शक्यता आहे. यावेळी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येवुन उत्साहाच्या व शिस्तीने शांततेत साजरे करावे, असे आवाहन फैजपुर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनी यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले. याप्रसंगी तालुक्यातील व शहरातील सर्व दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.
मार्गदर्शन करतांना अन्नपुर्णासिंग म्हणाल्या की, दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण होईल असे सोशल मिडीयाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील असेही सांगितले. यावेळी पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांनी शहरातुन निघणाऱ्या दुर्गादेवी विसर्जनाच्या संदर्भातील समस्या व अडचणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून समजुन घेतल्या. या बैठकीस निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते , पोलीस निरिक्षक प्रदिप ठाकुर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी, महावितरण अधिकारी अशोक लाहोडे यांच्यासह शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान, गोपाळसिंग पाटील, विजय सराफ, प्रा,मुकेश येवले, असलम शेख नबी, डॉ.निलेश गडे, हाजी ईकबाल खान, हाजी गफ्फार शाह, मनसेचे चेतन अढळकर, राहुल बारी, हाजी गुलाम रसुल मेंबर, शरद कोळी,पप्पू जोशी, कृउबाचे संचालक सुनिल बारी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.