जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाजाच्या वतीने आज (दि.५ जुन) रमजान ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील एस टी वर्कशॉप परिसरातील ईदगाह् मैदानावर सकाळी ९.०० वाजता शेकडो मुस्लीम बांधवांनी सामुहीक नमाज पठन केले.
काल सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास चंद्रदर्शन झाल्यावर शहरातील बाजार पेठेत मुस्लीम बांधवांनी विविध प्रकारच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. आज सकाळपासून लहान मुला-मुलींपासुन तरूण सगळेजण नवी वस्त्रे परिधान करून महिनाभर उपवास रोजे ठेवणाऱ्या रोजेदारांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतांना दिसुन येत होते. ईदगाह मैदानावर नमाज पठनानंतर सगळ्यांनी एकमेकाना ईदच्या शुभेच्छा दिल्या.