जळगाव, प्रतिनिधी । माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भाजपा मंडल क्र ३ तर्फे आयोध्यानगर येथे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा मंडल क्र ३ तर्फे रामलिला गार्डन लिलापार्क आयोध्यानगर येथे भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महानगर सरचीटणीस नितीन इंगळे, मंडल अध्यक्ष प्रविण कोल्हे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक डाॅ.विरण खडके, मातोश्री कंट्रक्शनचे संचालक विजय वानखेडे, प्रभाग समिती सद्स संतोष इंगळे,मंडल उपअध्यक्ष प्रमोद (भैय्या)चौधरी, मंडल सरचिणीस किसन मराठे, मंडल चिटणीस शैलेंद्र खडसे, राहुल पाटील, जेष्ठना गरिक मंडल आघाडीचे अध्यक्ष अर्जुन नारखेडे, उपअध्यक्ष लक्ष्मण अत्तरदे, शेतकरि आघाडीचे मंडल उपअध्यक्ष महेश भांरबे, बुथ प्रमुख मयुर नारखेडे, हितेश नारखेडे, व पदअधिकारी व कार्यक्रते उपस्थित होते.