भुसावळ, प्रतिनिधी | येथे श्रीराधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातर्फे आज (दि.२९) महाराज अग्रसेन यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी अष्टभुजा देवी मंदिरापासून व्यंकटेश बालाजी मंदिरापर्यंत प्रभात फेरी काढून पांडूरंग टॉकीज समोरील महाराजा अग्रसेन चौकात श्रीराधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातील सदस्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी आरती व भजनही करण्यात आले. राधेश्याम लाहोटी, श्याम अग्रवाल, संजय अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, सुनील लाहोटी, लिलाधर अग्रवाल, जी.आर.ठाकूर, संगीता अग्रवाल, कल्पना टेमाणी, प्रिया अग्रवाल, राज भराडीया, कृष्णा भराडीया आदी यावेळी उपस्थित होते.