जळगाव, प्रतिनिधी | भारतीय हॉकीचे जादूगार खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त केसीई सोसयटीच्या शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्राध्यापक निलेश जोशी,प्रा. संदीप केदार, प्रा.दुष्यंत भाटेवाल, प्रा.पंकज पाटील, प्रा..प्रवीण कोल्हे उपस्थित होते. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱयात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलंपिकमध्ये हॉकी खेळात ३ सुवर्ण पदके जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या स्मरणात २९ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो अशी माहिती प्रा. निलेश जोशी यांनी दिली.यावेळी जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक प्रशांत सोनवणे,केतकी सोनार,संजय जुमनाके व विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.