
धरणगाव (प्रतिनिधी) येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात आज १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिनानिमित्त संस्थेचे संचालक ललित उपासनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस. पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील व सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.