जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील दर्पण बहुउद्दशीय प्रतिष्ठान संचालित ग्लोबल महाराष्ट्र नर्सिंग इन्स्टिट्युट येथे माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केक कापून ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ साजरा करण्यात आला.
या वेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिना निमित्त प्रतिमा पूजन केले. नर्सिंग इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्याना संबोधित करताना “डॉक्टरांसोबतच आजारी रुग्णांच्या उपचारात पूर्ण सहकार्य करणाऱ्या परिचारिकांचाही कोरोना साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या लोकांच्या उपचारात महत्त्वाचा वाटा आहे. परिचारिकांच्या धैर्याबद्दल आणि त्यांच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल, कार्याचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा आंतरराष्ट्रीय नर्सिंग डे साजरा केला जातो.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनी परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आज 12 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ साजरा केला जातो. जानेवारी १९७४ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
या वेळी जामनेर नपचे उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, दर्पण बहुउद्दशीय प्रतिष्ठानचे विवेक पाटील, दीपक पाटील, डॉ. राजेश नाईक, नर्सिंग इन्स्टिट्युटचे शिक्षक, कर्मचारी, प्रशिक्षणार्थीं आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी प्रशिक्षणार्थींनी केक कापून ‘आंतरराष्ट्रीय नर्सिंग डे’ साजरा केला.