जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गणेश उत्सव व रमजान ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या हॉलमध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग कविता नेरकर यांनी गणेश उत्सव व रमजान ईद आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन शांततेत साजरा करावे.
त्याचबरोबर डीजेचा वापर टाळावा, जेणेकरून कोणाला त्रास होईल किंवा कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारे आपण न वागता सोशल मीडियाच्या वापर करताना कोणते प्रकारे कोणाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट करू नये असे त्यांनी सर्व सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, नितीन बागुल, नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर, महावितरण अभियंता करेरा यांच्यासह जामनेर शहरातील शांतता कमिटी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.