सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर;हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा अव्वल

cbse result

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का देत १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आलाआहे. सर्व विभागांचे निकाल एकाचवेळी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाचा यंदाचा निकाल ८३.४ टक्के इतका लागला आहे. दरम्यान, १२ वीच्या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनींनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्यांना प्रत्येकी ४९९ इतके गुण मिळाले आहेत.

 

 

सीबीएसई सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 10 विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल. यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले. या वेळी मात्र निवडणुकीमुळे सीबीएसईच्या परीक्षा लवकर आटोपण्यात आल्या होत्या.

Add Comment

Protected Content