यावल

भुसावळ यावल राजकीय

जि.प. सदस्या नंदाताई सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयास प्रारंभ (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्या नंदाताई दिलीप सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज आमदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. नंदाताई दिलीप सपकाळे यांनी अंजाळे या गावी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांनी याचे उदघाटन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे विधानसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे, अंजाळे येथील सरपंच मनीषा कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रमीलाबाई सपकाळे, त्र्यंबक सपकाळे, योगेश साळुंके, शांताराम सपकाळे, सुनील सपकाळे, पंकज सपकाळे, शंकर कोळी, सागर सपकाळे, संजय सपकाळे, विशाल सपकाळे, अमोल सपकाळे, भैया मोरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, आज अगदी अंजाळे […]

यावल राजकीय

काँग्रेसच्या चलो पंचायत अभियानास प्रारंभ

फैजपूर प्रतिनिधी । रावेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे चलो पंचायत या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. येथील आठवडे बाजारात यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी, तर जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव डॉ.शोएब पटेल, जळगाव शहराध्यक्ष मुक्तदीर देशमुख, अलीम शेख, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, फैजपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद कौसर, शेख वसीम जनाब, मुदस्सर नजर शेख, प्रा.वहीदुजमा, शेख रियाज, शेखर तायडे, जिल्हा सरचिटणीस रामराव मोरे, नरेंद्र नारखेडे, बबन तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता असून महागाईने जनता त्रस्त, […]

क्राईम यावल

ट्रॅक्टरने दोन विद्यार्थ्यांचा चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

यावल प्रतिनिधी । वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने दोन विद्यार्थ्यांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या गावर्‍यांनी ट्रॅक्टरला जाळून रास्ता रोको केल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी तालुक्यातील चिंचोली जवळ आडगाव रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने आज सकाळी एका दुचाकीला धडक दिली. यात दोन विद्यार्थी जागेवरच ठार झाले आहेत. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी ट्रॅक्टर जाळून टाकले असून रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्मित झाले असून रहदारीदेखील ठप्प झाली आहे.

यावल राजकीय

यावल येथे शिवसेनेतर्फे दहशतवादी हल्ल्याचा निषेध

यावल (प्रतिनिधी) येथील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी शाखा व सर्व संलग्न संघटनांतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे १६ फेब्रूवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता पुलवामा येथे झालेल्या दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवानांना श्रद्धांजली वाहुन पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. त्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे भुसावळ टी पॉइंटवर पाकिस्तानचा पुतळयाचे दहन करण्यात आले या ठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात येवून जोरदार निषेध व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देऊन पाकिस्तान जाहीर निषेध केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, उपजिल्हा संघटक दीपक बेहडे, शिवसेना तालुका प्रमुख रवी सोनवणे, युवा सेना तालुकाप्रमुख […]

यावल सामाजिक

यावल येथे शहीदाना श्रद्धांजली

यावल (प्रतिनिधी) पुलवामा येथे दहशदवादयांनी घडवुन आणलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथे भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तालुका चालक मालक संघाच्या वतीने या दहश्दवादी हल्याच्या निषेर्धात यावल ते भुसावळ, यावल ते चोपडा, यावल ते फैजपुर, व इतर ग्रामीण भागात प्रवाशी वाहतुक करणाऱ्या सुमारे ८०० वाहन चालकांनी यावेळी आपला सहभाग नोंदविला. सकाळी भुसावळ टी पाँईटवर शेकडो युवकांनी दहशदवादी हल्याचा निषेध नोंदवला. यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. शहरातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने व व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवले. येथील स्वामी विवेकानंद प्रायमरी इंग्लीश स्कुलच्या वतीने देशासाठी वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणुन दिनांक १७रोजी रविवारच्या दिवशी होणार […]

यावल

चितोडाजवळ दोन मोटार सायकलींची धडक; तिघे जखमी

यावल (प्रातिनिधी) येथून जवळ असलेल्या चितोडा गावाजवळ दोन मोटारसायकलींमध्ये टक्कर होवुन एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत.   तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा यात्रेचे शेवटचे दोन दिवस सोमवारी पूर्ण होत असुन, या मुंजोबाच्या दर्शनासाठी गेलेले किरण दिलीप जैन, रा.यावल व वैभव गोपाळ इंगळे, यांच्या मोटरसायकलींमध्ये समोरा-समोर टक्कर होवुन यात किरण वैभव जैन यांच्या उजव्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. यातील दुसरा मोटारसायकलस्वार वैभव गोपाळ इंगळे व त्याची आई उषा गोपाळ इंगळे (रा. हिंगोणा) हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताचे वृत कळताच यावल पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील यांनी यावलच्या […]

यावल सामाजिक

यावल येथे शहिदांना श्रद्धांजली

यावल (प्रतिनिधी) पुलवामा येथे दहशदवादयांनी घडवुन आणलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथे भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तालुका चालक मालक संघाच्या वतीने या दहश्दवादी हल्याच्या निषेर्धात यावल ते भुसावळ, यावल ते चोपडा, यावल ते फैजपुर, व इतर ग्रामीण भागात प्रवाशी वाहतुक करणाऱ्या सुमारे ८०० वाहन चालकांनी यावेळी आपला सहभाग नोंदविला. सकाळी भुसावळ टी पाँईटवर शेकडो युवकांनी दहशदवादी हल्याचा निषेध नोंदवला. यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. शहरातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने व व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवले. येथील स्वामी विवेकानंद प्रायमरी इंग्लीश स्कुलच्या वतीने देशासाठी वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणुन दिनांक १७रोजी रविवारच्या दिवशी होणार […]

यावल रावेर सामाजिक

सातपुड्याचे वैभव जपण्यासाठी आदिवासी बांधवांचे योगदान महत्वाचे – राजेंद्र राणे

रावेर (प्रतिनिधी) रावेर व यावल तालुक्यात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सातपुडा पर्वताची महत्वाची भूमिका असून या सातपुड्याचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे योगदान अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्र.सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र राणे यांनी कुसुंबा येथील कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलतांना केले. वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जंगलावरील भार कमी होण्यासाठी कुसुंबा येथील संयूक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत सातपुडा पर्वताच्या लगत असलेल्या गावातील नागरिकांना घरगुती गॅस संचांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षपदी राजेंद्र राणे हे होते, तर गॅस संच वाटप तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी श्री. राणे पुढे म्हणाले की, पर्यावरण संरक्षणासाठी जल, जमीन आणि जंगल यांचे महत्त्व असून त्याचे […]

यावल राजकीय

यावल पं.स. च्या नूतन इमारतीचे ना. महाजन यांच्याहस्ते होणार भूमिपूजन

यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम दि.१४ दुपारी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ. उज्वलाताई मच्छिंद्र पाटील, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, डॉ.बी.एन.पाटील( जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी), जिल्हा परिषद सदस्या सौ. अरूणाताई रामदास पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, जि.प. सदस्य रवींद सुर्यभान पाटील, सौ.नंदाताई दिलीप सपकाळे आदी मान्यवर उस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ.पल्लवी पुरुजीत चौधरी, सभापती उमाकांत रामराव पाटील, पंचायत समितीचे गटनेता व प.स. […]

क्राईम यावल

जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दगडी मनवेल या गावातील दाम्पत्याला जातीवाचक शाब्दीक चकमक व मारहाण केल्या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहीती अशी की दगडीमनवेल ता. यावल येथील राहणारे शाम जगदीश भिल यांच्या पत्नी दिनांक १० फेब्रुवारी रोजी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी गजानन पाटील यांच्या घरा जवळुन जात असतांना त्यांच्या पत्नीला गटारीच्या विषयावरून विचारपुस करण्यात आली. यातुन वाद उत्पन्न होवुन शाम जगदीश भिल हा जाब विचारण्यास गेले असता गावातील ज्ञानेश्‍वर ढोलु पाटील, संजु ढोलु पाटील, विकास पाटील, वासुदेव पाटील, सुनिल पाटील, यांनी शाम भिल व त्यांच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत शाम […]