अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील धुपी गावात एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ५७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी ८ जुलै रोजी पहाटे ३ वाजता उघडकीस आली. या संदर्भात सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष श्रीराम जाधव (वय ५९, रा. धुपी, ता. अमळनेर, हल्ली मुक्काम नाशिक) हे काही दिवसांपूर्वी नाशिक येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर, घरातील लोखंडी कपाटातून ५७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही चोरी मंगळवारी, ८ जुलै रोजी पहाटे तीन वाजता समोर आली.

या घटनेमुळे धुपी गावात खळबळ उडाली आहे. सुभाष जाधव यांनी तातडीने अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली, त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील करत आहेत.



