वृध्द महिलेच्या पिशवीतून ३५ हजारांची रोकड लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील बडोदा बँके परिसरातून रिक्षातून प्रवास करत असलेल्या एका वृध्द महिलेच्या पिशवीतून ३५ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कल्पनाबाई भिमराव पाटील वय ६० या महिला आपल्या कुटुंबियांसह फरशीरोड परिसरात वास्तव्याला आहेत. मंगळवारी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या बडोदा बँक परिसरातून रिक्षाचे प्रवास करत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतून ३५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मिलीद अशोक सोनार हे करीत आहे.

Protected Content