Home क्राईम पान दुकान फोडून रोकड लांबविली; गुन्हा दाखल

पान दुकान फोडून रोकड लांबविली; गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बी.जे.मार्केट येथील विजय पान हाऊस दुकान फोडून ४ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याबाबत दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीष विजय सैंदाणे वय ३९ रा. स्टेट बँक कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे बी.जे.मार्केट येथे विजय पान हाऊस दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ३ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पानटपरी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत दुकानातून ४ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार समोर आल्यानंतर दुकानदार गिरीश सैंदाणे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली. याप्रकरणी सोमवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound