चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथील इंडीकॅश कंपनीचे एटीएम सहीत रोकड असा एकुण ४ लाख ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील अडावद येथे बसस्थानकाजवळ टाटा कम्यूनिकेशन पमेंट सॉलूशन कंपनीचे इंडीकॅशन एटीएम मशिन लावण्यात आले आहे. २० ऑक्टोबर रात्री १०.३० तेर २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.१५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २ लाख रूपये किंमतीचे एटीएम मशीन आणि मशीनमधील २ लाख ४९ हजार रूपयांची रोकड असा एकुण ४ लाख ४९ हजार रूपयांचा मुद्देमाल एटीएम मशीनसह लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी दिनेश अशोक ढोणे यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल तायडे करीत आहे.