Home क्राईम अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
168


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माणुसकीच्या नात्याने एका तरुणाला दुचाकीवर लिफ्ट देणं एका कुटुंबाला महागात पडलं आहे. लिफ्ट दिलेल्या तरुणाने मदतीचा गैरफायदा घेत दुचाकीवर बसलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा मोठा भाऊ १३ सप्टेंबर रोजी कामासाठी जळगावला गेला होता. त्यामुळे घरातील ११ आणि ९ वर्षांच्या दोन मुलींना घेऊन जेवण करण्यासाठी तो शेजारच्या गावात गेला होता. जेवण आटोपून तो दोन्ही पुतण्यांसोबत दुचाकीने गावाकडे परत येत असताना, वाटेत त्याला त्याच गावातील नंदराज मोरे नावाचा तरुण भेटला. त्याने लिफ्ट देण्याची विनंती केली. गावातील ओळखीचा असल्याने त्याने मदत म्हणून मोरेला दुचाकीवर बसवले. मोरे हा दुचाकीवर मागे, ९ वर्षांच्या मुलीच्या मागे बसला होता. याच संधीचा फायदा घेत मोरेने त्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले आणि तिची छेड काढली.

गावी परत आल्यावर घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीच्या काकांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि नंदराज मोरे विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ नंदराज मोरेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३५४, आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. माणुसकीच्या नात्याने केलेल्या मदतीचा गैरवापर करून एका निष्पाप मुलीची छेडछाड केल्याच्या या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. समाजातील माणुसकीवरील विश्वासार्हतेवरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound